रांजणगाव गणपती : हार, नारळ, फळ विक्रेत्यांना देऊळ बंदचा फटका

रांजणगाव गणपती : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्ह्णून आहे. परंतु येथील महागणपती मंदिर करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गेल्या सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे.

मंदिर बंद असल्याने भाविकाविना मंदिर परिसर सुना-सुना वाटत आहे. मंदिरात गर्दी, गोंगाटा ऐवजी  पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. मंदिर परिसरातील हार, फुले, नारळ, पूजेचे साहित्य तसेच फळ विक्रेत्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

https://www.facebook.com/217046208635092/posts/1330285067311195/

लॉकडाऊन वाढल्यामुळे रांजणगाव येथील महागणपतीचे मंदिर गेले अनेक बंद राहिल्याने देवस्थानसह व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती रांजणगाव गणपती देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी प्रभातशी बोलताना सांगितली आहे.

Leave a Comment