पिडीतेसोबत करणार बलात्कारी लग्न

चंदीगड : बलात्कार प्रकरणात तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विवाह बंधनात अडकणार आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला आहे. हे प्रकरण हरियाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील आहे. पॅरोलसाठी याचिका दाखल करणार्‍या कैद्याला कुरुक्षेत्र जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कोर्टात दाखल केलेल्या पॅरोल याचिकेत कैद्याने सांगितले की, मला लग्न करायचे आहे. मी त्याच अत्याचार पीडित मुलीशी लग्न करणार असल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले आहे . जेव्हा न्यायालयाने पीडितेला जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, कोणत्याही दबावशिवाय माझ्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे. तिचे वडील म्हणाले की बलात्काराच्या घटनेवेळी त्याची मुलगी 16 वर्षांची होती, आता ती 19 वर्षांची आहे.  तिचे कुटुंबीय लग्नासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कैदयाने आपल्या लग्नासाठी दहा दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली चार आठवड्यांच्या पॅरोलचा आदेश दिला आहे.

 

Leave a Comment