Pune Crime : मावस बहिणीवर बलात्कार करणाऱ्यास 10 वर्ष ‘सक्तमजुरी’

पुणे – मावस बहिणीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संग्राम कैलास सरवदे पंचवीस वर्षीय तरूणाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असलाचेही आदेशात म्हटले आहे.

1 मार्च 2017 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नवी सांगवी परिसरात ही घटना घडली. याबाबत 40 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो तरूण कामानिमित्त घटनेच्या पूर्वी सहा वर्षांपासून त्याच्या मावशीच्या घरी राहत होता.

घटनेच्या दिवशी त्याने 15 वर्षीय अल्पवयीन पीडितेला फुस लावून पळवून नेत भाड्याच्या खोलीत ठेवले. यावेळी, तुझे 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे. असे खोटे सांगुन तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी त्याला अटक करत दोषारोपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले.

Leave a Comment