रवींद्र धंकेगरांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ ; पबचा फोटो शेअर करत म्हणाले,”अन्यथा 48 तासांच्या आत…”

Ravindra Dhankegar। पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले. त्यात पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या घटनेवर आक्रमक होताना दिसत आहेत. त्यात त्यांच्या एका नव्या ट्विटमुळे खबल उडाली आहे.

रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. पुणे पोलिसांकडून पब, हॉटेल्स यांच्याकडून हफ्ते गोळा करण्याचे काम केले जात आहे, असा दावा धंगेकर यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट केलाय. त्यांच्या या ट्वीटमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. फोटोतील पोलिसांवर कारवाई करा अन्यथा 48 तासांच्या आत आम्ही या पोलिसाचा व्हिडीओ ट्वीट करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.


रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये,” राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे. 

“दिवस १ला – मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स , हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..! “असे म्हटले आहे.