“मी शेतकऱ्याचा मुलगा तर राहुल गांधी …”

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.  केंद्र सरकारने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना येत्या  ( 30 डिसेंबर  ) आज चर्चेला बोलावले आहे. यातच या आंदोलनावरून तर दुसरीकडे राजकीय खडाजंगी जोरात सुरू आहे.  काँग्रेसने या आंदोलनाला पाठींबा दिला असून  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर शेतकऱ्यांवर खलिस्तानी व नक्षलावादी असल्याचा  आरोपावर निशाणा साधला होता. यावरूनच आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे 

दरम्यान राजनाथ  सिंह म्हणाले,’राहुल गांधी वयाने माझ्यापेक्षा लहान असून त्यांना शेतीबाबत काहीच माहिती नाही. तर  मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला शेतीबाबत त्यांचा पेक्षा दुप्पट माहिती आहे.  तर आपल्या पंतप्रधानांनीही एका गरीब महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. असे असतांना आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही. यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही ..” असं त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर टीकेवर प्रत्युतर दिलं आहे.

Leave a Comment