रेखाने चाहत्याला मारली चापट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई – अभिनेत्री रेखावर नेहमीच चाहत्यांसह सर्वांचे लक्ष  वेधून घेते. रेखाकडे पाहून तिचे वय ६८ आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. या वयातही तिचं सौंदर्य, स्टाईल आणि अंदाज सर्वांना आकर्षित करतो. नुकतीच तिने एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती, ज्यामध्ये तिच्या आकर्षक शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. रेखासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहतेही उत्सुक दिसले. अशातच एका व्यक्तीला रेखाने  चापट मारली या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

एका कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा रेखावर खिळल्या होत्या. या दरम्यानचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रेखा चाहते आणि पापाराझी यांच्यात दिसत आहेत. रेखा हसत असून हात जोडून पोज देत आहे.

दरम्यान, एका चाहत्याने रेखाला तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबवले. रेखा थांबली. आधी तिने चापट मारण्याचा इशारा केला, मग त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिने फोटो क्लिक करून घेतला आणि मग त्याला प्रेमाने चापट मारली. यानंतर रेखा हसत हसत निघून गेली आणि पापाराझींसाठी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देतांना दिली. रेखाची ही स्टाईल पाहून यूजर्सही खूश झाले .

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रेखा 2014 पासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, 2023 मध्ये ती टीव्ही शो ‘गुम है किसी के प्यार में’च्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये दिसली होती.