रेखाचे टीवीवर कमबैक..! ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत होणार एंट्री

मुंबई – बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा  सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसते. अशात आता रेखा यांच्या चाहत्यांना ती रोज बघायला मिळणार आहे. रेखा लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. ती आता स्टार प्लसची हिट सीरियल ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये दिसणार आहे.

स्टार प्लस ची मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ला बघणार भरपूर मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे.  कारण  हि मालिका टीआरपी लिस्ट सर्वात पुढे आहे.  अशात अभिनेत्री रेखा या मालिकेत स्पेशल अपीयरेंस देणार आहे.

रेखा स्टार प्लसवर तिसर्‍यांदा दिसणार आहे. याआधीही ती ‘गुम है किसी के प्यार में’सोबत जोडली गेली आहे. रेखाचा या मालिकेशी खास कनेक्शन असल्याची चर्चा आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. रेखा शोच्या नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहे. त्यामुळे ती या शोमध्ये स्पेशल अपिअरन्स देणार आहे.  या मालिकेची राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी या शोची संयुक्त निर्मिती केली आहे.