बिल गेट्स आणि जेफ बेझाॅसकडे आहे ‘एवढी’ जमीन; आकडा वाचून अचंबित व्हाल

वाशिंग्टन – मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बरीच संपत्ती मिळवून अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले बिल गेट्‌स सध्या लोकोपयोगी सेवावर बराच खर्च करीत आहेत. त्यांच्याकडे अमेरिकेत बरीच शेतजमिन असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

बिल अँड मेलींडा गेट्‌स यांच्याकडे अमेरिकेतील 18 राज्यातील 2 लाख 42 हजार एकर जमीन आहे. बिल गेट्‌स यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन का खरेदी केली आहे याचे स्पष्टीकरण उपलब्ध नाही.

वातावरण बदलाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे कृत्य केले आहे की शाश्वत शेतीचा प्रयोग करण्याचा त्यांचा विचार आहे हे स्पष्ट झालेले नाही. बिल गेट यांच्याकडे सध्या 132 अब्ज डॉलर असून सध्या ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

मात्र गेटस्‌ यांनी एवढी मोठी जमीन खरेदी केले असूनही अमेरिकेतील 100 मोठ्या जमीनदारांच्या यादीत त्यांचे नाव नाही. या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर जॉन मेलोन असून त्यांच्याकडे 22 लाख एकर जमीन आहे. ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस 25 व्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 4 लाख 20 हजार एकर जमीन आहे.

Leave a Comment