संशोधन उपयुक्‍त ठरणारे असावे : लेफ्ट.जन. डॉ. कानिटकर

पुणे – आपण करत असलेले संशोधन समाजासाठी उपयुक्‍त ठरणारे असावे, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आरोग्य शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठी “ऍडव्हान्स रिसर्च मेथडॉलॉजी’ ऑनलाइन कार्यशाळा झाली. त्याच्या उद्‌घाटन समारंभाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर ऑनलाइन तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कानिटकर यांच्या समवेत कुलसिचव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त आणि लेखाधिकारी नरहरी कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे उपस्थित होते.

संशोधन पद्धतीचा सखोल अभ्यास हा संशोधनातील प्रमुख गाभा असतो. ही पद्धती जर दोष विरहित झाली तर अंगीकृत कोणत्याही कार्यात यश मिळते. संशोधन पद्धतीमध्ये अचूकतेवर आणि परिपूर्णतेवर भर दिल्यास त्याची गुणवत्ता अधिक वाढू शकते, असे डॉ. कानिटकर म्हणाल्या.