पुणे जिल्हा | कळंबच्या प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

मंचर, (प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामविकास मंडळ संचलित कमलजादेवी प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव होत्या. या प्रसंगी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे, लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे, गटशिक्षणाधिकारी सविता माळी, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, साहेबराव शिंदे, विस्तार अधिकारी गजानन पुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी उपसरपंच गंगाराम भालेराव,

माजी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कानडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भालेराव, उपाध्यक्ष प्रिया भालेराव, प्राचार्य सुनील टाव्हरे, उपप्राचार्य भास्कर कांबळे, मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार विविध गाण्यातून सादर केले.

यावेळी उपस्थित प्रेक्षकांमधून मुलांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव,शिक्षिका स्वाती भालेराव यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका शीतल रामकर सूत्रसंचालन केले. अदिती चिखले, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष कानडे तसेच विद्यार्थ्यांमधून साई कानडे आणि जोया शेख यांनी मनोगत व्यक्‍त केले.

माजी सभापती उषाताई कानडे,गटशिक्षणाधिकारी सविता माळी,मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे,सुनील टाव्हरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका मीना निऱ्हाळी, गीतांजली शेलार, सुनिता चासकर, सनाह शेख, शिक्षक गणेश लोहकरे,मदतनीस राजश्री भालेराव,सुरेखा दळवी यांनी विशेष प्रयत्न केले.