रिया चक्रवर्तीला अटक; एनसीबीची कारवाई

मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी (Sushant Singh Rajput) संबंधित असलेल्या अंमलीपदार्थ प्रकरणात आज अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अटक करण्यात आली. तीन दिवसीय चौकशीनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी माहिती देताना एनसीबीकडून, रिया चक्रवर्ती चौकशीसाठी हजर झाल्यानंतर याप्रकरणात याआधी अटकेत असलेले रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व सुशांतच्या घरात काम करणारा दीपेश सावंत यासर्वांना एकमेकांसमोर आणणार असल्याचं म्हंटल होत. यामुळे अंमलीपदार्थ साखळीत कोणी काय भूमिका बजावली हे समजून घेणे सोपे होईल असंही एनसीबीयाकडून सांगण्यात आलं होत.

तत्पूर्वी, रियाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये आपण कधीही अंमलीपदार्थांचे सेवन केलं नसल्याचं सांगितलं होत. तसेच सुशांत सिंग राजपूत हा गांजाचे व्यसन करत असल्याचाही खुलासा तिने केला होता. याप्रकरणात रियाची ईडी व सीबीआयकडूनही चौकशी करण्यात आली असून या चौकशीमधूनच सुशांत मृत्यू प्रकरणाला अंमलीपदार्थांची किनार असल्याचे पुढे आले होते.

दरम्यान, एनसीबीने सुशांत मृत्य प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंमलीपदार्थ प्रकरणात आतापर्यंत आठ जणांनाअटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार हाऊस मॅनेजर मिरांडा याने आपण सुशांतसाठी गांजा खरेदी करत असू अशी कबुली दिली आहे.   

 

Leave a Comment