Accident : 800 फूट खोल दरीत कोसळली कार; CRPF जवानासह 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिल्ह्यात कार दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सीआरपीएफ जवानासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी आहे.

रामबन जिल्ह्यातील डिगडोल परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने इनोव्हा कार 800 फूट खोल दरीत कोसळली. महामार्गावरील लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तातडीने घटनास्थळी पोहचून पोलिस आणि सुरक्षा दलाने मदत कार्य सुरु केले.

माहितीनुसार, कारमध्ये 6 जण प्रवास करत होते. ते सर्व  श्रीनगरहून जम्मूकडे जात होते. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य एकजण जखमी आहे.