T20 World Cup 2024 : ‘हा सगळा मूर्खपणा…’, ‘विश्वचषकासाठीच्या संघ निवडीच्या बातमीवर रोहित शर्माचा राग शिगेला….

ICC Men’s T20 World Cup 2024, Rohit Sharma :  आयसीसी पुरुष T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. T20 क्रिकेटचा हा महाकुंभ 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये जगातील 20 संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाची निवड हा चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच रोहित शर्माने भारतीय संघाच्या निवडीसाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid ) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पण आता ‘हिटमॅन’ने अशा सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्या अहवालात रोहितसोबत विराट कोहलीला ओपनिंगची संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला होता.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) या सर्व बातम्यांना बकवास(मूर्खपणा) म्हटले आहे. त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि म्हणाला की, “मी कोणालाही भेटलो नाही. अजित आगरकर दुबईत कुठेतरी गोल्फ खेळत असतील. राहुल द्रविड बेंगळुरूमध्ये त्याच्या मुलांना खेळताना पाहत आहेत. खरे सांगायचे तर, आमची कोणाचीच भेट किंवा चर्चा झालेली नाही. सध्याच्या काळात तुम्ही माझ्याकडून किंवा राहुल द्रविड यांच्याकडून तसेच अजित आगरकर किंवा बीसीसीआयकडून अथवा कोणी स्वत: कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नाही, तो पर्यंत हे सगळं फेक, खोटं आहे.”

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील संघ घोषित करण्यासाठी ICC ने 1 मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 मे रोजी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करू शकते, असे वृत्त आहे. हा संघ 37 वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रियान पराग आणि शिवम दुबेसह इतर अनेक युवा खेळाडूंनी आयपीएल 2024 मध्ये निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत यावेळी अनेक युवा खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

Photos : पहिल्या भेटीतच Yuvraj Singh च्या बहिणीच्या प्रेमात ‘क्लिन बोल्ड’ झाला होता रोहित शर्मा, ‘असं’ केलं होतं प्रपोज, जाणून घ्या…हिटमॅनची लव्हस्टोरी

दरम्यान, बातमीचा सोर्स विश्वसनीय असला पाहिजे. कुठलीही खातरजमा न करता येणाऱ्या बातम्यांबद्दल रोहित शर्माने सावध राहण्याचा सल्ला दिला. रोहित शर्माने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. वास्तविक, मायकल वॉन आणि एडम गिलख्रिस्ट यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना रोहित शर्माने संबंधित भेटीचे आणि संघनिवडीचे वृत्त फेटाळून लावलं असून ते वृत्त खोट असल्याच सांगितले आहे.