अहमदनगरच्या रोशनीला राष्ट्रीय (रायफल शूटिंग) शॉटगन (डबल ट्रॅप) खेळ प्रकारात सुवर्णपदक

नेवासा : दिल्ली येथे सुरू असलेल्या ६६ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा (दि.१५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर) दरम्यान स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पब्लिक स्कूलची कु.रोशनी मंजू बागडे हिने शॉटगन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात अहमदनगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेत मिळवत पहिला पदकाचा मान मिळविला आहे.

रायफल शुटिंग खेळ हा अतिशय महागडा असून तिने आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत आपल्या आईच्या सहकार्याने व स्वतःच्या मेहनतीने आतापर्यंत तिने विविध स्पर्धेत १० पदके मिळविली आहेत व पुढील होणाऱ्या इंडियन टीम ट्रायल्स करता आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या रोशनीची निवड झाली आहे.

वरील यशस्वी खेळाडूला त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील,अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगेपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, एनडीए प्रमुख कर्नल के पी सिंग,टी.एम.एस विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, टी.पी.एसचे प्राचार्य सचिन कर्डीले, समन्वयक दत्ताञय वांढेकर,टी आय एसचे प्राचार्य जितेंद्र पाटील,

त्रिमूर्ती सिनिअर कॉलेजच्या  अनुराधा गोरे व प्राचार्य मुख्य क्रीडा समन्वयक संजयसिंग चव्हाण, विभाग प्रमुख देशमुख, कानवडे , राऊत , कात्रस, झांबाडे , टी एम एस विद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख,एकनाथ कापसे उमाजी जंगले, नामदेव ताके,संतोष निबाळकर, गोरक्षनाथ वराळे, मिलिंद सोनवणे साबळे, नवनाथ बस्मे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे पद अधिकारी डोळसे,परमेश्वर कसाळ,गजानन समिंदर,शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांच्याकडून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.

वरील यशस्वी खेळाडूला प्रशिक्षक छबुराव काळे विजय जाधव, सुनीता लिपणे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तसेच अभिजित  दळवी,संभाजी निकाळजे, महादेव काकडे, अशोक पानकडे, गणेश शिंदे, संदीप वाघमारे, दाने , गायके, चिरमाडे , समीर पठाण , अमीर पठाण , गायकवाड, सरोदे , समीर पठाण आदि प्रशिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.