“ठाणे मेट्रो 4’चा मार्ग मोकळा

मुंबई : ठाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो 4 प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो मार्गात येणाऱ्या 36 झाडे मोडण्यास परवानगी देताना न्यायालयाने 913 झाडांचे पुनरोपन काळजी पूर्वक करा, असे निर्देश एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला दिले.

ठाणे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीए मार्फत कासारवडवली(ठाणे) ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासह ठाण्यातील रस्ता रुदींकरण, रस्ता बांधणी, गृहनिर्माण आदी 18 प्रकल्पांसाठी सुमारे 3800 झाडांची होणारी वृक्षतोड परवानगीशिवाय केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला होता. यावर पर्यावरण प्रेमींनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यामयूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने झाडे तोडण्या दिलेली स्थगिती आज उठवत एमएमआरडीएला मोठा दिलासा दिला.

न्यायालयाने 18 पैकी 6 विकासकामांसाठी वृक्षतोड करण्याची परवानगी दिली. त्याच बरोबर इतर खासगी प्रकल्पासाठी 2012 झाडे तोडण्याच्या परवानगीवर मात्र स्थगिती कायम ठेवली.

Leave a Comment