RRR 2 येणार ! ‘या’ ठिकाणी होणार भव्यदिव्य शूटिंग.. मोठी अपडेट आली समोर

मुंबई – एसएस राजामौली दिग्दर्शित आणि रामचरण-ज्युनियर एनटीआर अभिनीत आर आर आर हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाचा डंका ऑस्करमध्येही वाजला. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी त्याचा सिक्वेल जाहीर केला. सिक्वेलची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला थारा नाही आणि ते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांसाठी एक खास अपडेट समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, ‘आर आर आर 2’ च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आफ्रिकेत होणार आहे. नुकतंच एका मीडिया मुलाखतीदरम्यान, एसएस राजामौलीचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी खुलासा केला की चित्रपटाच्या सिक्वेलची कथा आफ्रिकेतुन सुरू होणार आहे.

विजयेंद्र प्रसाद पुढे म्हणाले की, त्यांच्या मुलाला ही कल्पना आवडली आणि त्यांनी ती पूर्ण स्क्रिप्टमध्ये तयार करण्यास सांगितले. सध्या त्यांचा मुलगा अर्थात दिग्दर्शक एसएस राजामौली महेश बाबूसोबत त्यांच्या पुढील प्रोजेक्टवर काम करत आहेत. ते पूर्ण झाल्यानंतरच तो आर आर आर 2 वर काम सुरू करेल असंही ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाला, ‘मला माझ्या मुलाचा स्वभाव माहीत आहे, जोपर्यंत तो महेशसोबतचा चित्रपट पूर्ण करत नाही तोपर्यंत तो सिक्वेलकडे लक्ष देणार नाही. यानंतर जर त्याला स्क्रिप्ट लोकेशन हे सगळं आवडलं आणि हीरोजकडे वेळ असेल तर सिक्वेलचे शूटिंग सुरू होईल.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसएस राजामौली यांनीही ‘RRR 2’ वर काम सुरू असल्याची पुष्टी केली होती. ते म्हणाले होते, ‘माझ्या सर्व चित्रपटांचे कथालेखक माझे वडील आहेत. आम्ही आर आर 2 बद्दल चर्चा केली आहे आणि ते कथेवर काम देखील करत आहे.आम्ही हा चित्रपट अधिक मोठ्या स्केलवर करणार आहोत.