पिंपरी | महाराजांच्या गुणांचे राज्यकर्त्यांनी अनुकरण करण्याची गरज – ॲड रानवडे

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार-विचार, सुसंस्कृतपणा, कुशल प्रशासन आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हे गुण अंगिकरणे गरजेचे आहे. असे मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी येथील एच. ए. कॉलनी मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना ते बोलत होते.

३९१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई, सचिव सुरेश इंगळे, सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाल्मिक माने, सचिव राजवाडे, जमील शेख, ॲड. सुनील रानवडे, दिलीप वाघ, सुधीर कांबळे,

कौशल्या जाधव, करुणा यादव, मोहन जगताप आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नारायण बिरादार, राघव होजगे, अश्विनी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कवी देवेंद्र गावंडे यांनी महाराजांवर एक काव्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले. तर कार्यक्रमाच्या संयोजक जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुलभा यादव यांनी आभार मानले.