रूपाली भोसलेने अखेर सांगितले सिनेमात काम न करण्यामागचं कारण; म्हणाली…

मुंबई – ‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe kay karte) या मालिकेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle) या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहचली आहे. अनेक मालिकांमध्ये काम करणारी रुपाली खूपदा मोठ्या पडद्यावर झळकली नाही. अनेक चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र आता तिने एका पोस्टच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

इनस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर रुपाली भोसलेनी सांगितले की, ‘Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं, तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो.’

‘आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारले की तुम्ही सिनेमे का नाही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले. पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे.’

पुढे तिने लिहिले की, “ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते, तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे. कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं. “विनाकारण राजकारण” च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते.”


दरम्यान, यापूर्वी रूपाली भोसले बिग बॉस मराठीमध्ये देखील पाहायला मिळाली होती. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ नावाची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती अनेक जाहिरातींसाठी देखील काम करताना दिसते.