सचिन पायलट यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली –  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिने जग कोरोनाशी दोन हात करत आहे. सहा महिने झाले आता तरी कोरोना जाईल या उद्देशाने सगळे काम करत आहेत.  तसंच दिवाळीनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

देशातील काही दिग्गज आणि राजकीय नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसमधील नेते सचिन पायलट यांनाही कोरोना ससंर्ग झाला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.


सचिन पायलट ट्विट 

‘माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचणी करून घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असून लवकरच बरा होईन.’

Leave a Comment