सुरक्षित आहे वृत्तपत्र, कोणतीही भीती न बाळगता वाचा : WHO

नवी दिल्ली : वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे, असे  स्पष्टीकरण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे.

देशातील 32 राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच लोकांना घरातच राहण्यासही सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने , एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रावस करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते असे म्हटले आहे.

अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार, वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. संस्थेने वृत्तपत्रामुळे कोरोनाचा व्हायरस पसरणं अशक्य असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment