सैफ आणि सारा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र; बाप चोर, तर लेक होणार पोलीस..

मुंबई –  बाप – लेक सैफ अली खान आणि सारा अली खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघेही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या प्रोजेक्टचे शूटिंग नुकतेच झाले असून दोघांची लूकही समोर आला आहे. मात्र, हा प्रकल्प काय आहे, याबाबत कोणतीही विशेष माहिती मिळालेली नाही. इंटरनेटवर समोर आलेल्या लुकमध्ये सैफ अली खान एका कैद्याच्या भूमिकेत तर सारा अली खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. 

या फोटोमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. असा कोणता प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ही पिता-पुत्र जोडी या स्टाईलमध्ये दिसणार आहे, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. बाप लेकीमध्ये बाँडिंग खूप चांगले आहे. रिपोर्टनुसार, सैफ आणि साराने शूट दरम्यान संपूर्ण वातावरण आरामदायक आणि आनंदी केले.

जेव्हा सैफ आणि सारा फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होते, तेव्हा इब्राहिम अली खानही तिथे उपस्थित होता. आता या प्रोजेक्टमध्ये इब्राहिमही त्यांच्यासोबत असणार का, याची उत्सुकता लोकांना लागली आहे.  यादरम्यान साराने सैफ अली खानसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये इब्राहिमही तिच्यासोबत दिसत आहे. या फोटोत तिघेही कॅज्युअल दिसत आहेत.