सॅमसंगचा भारतीय बाजारात पुन्हा धमाका.! फक्त 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जबरदस्त 5G मोबाईल; फीचर्सने लावले वेड

Samsung F15 5g : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने सोमवारी (दि. 4) भारतात आपला नवीनतम ‘Samsung F15 5g’ मोबाइल लॉन्च केला. Samsung F15 5g मोबाईलची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy F15 5G हा Galaxy A15 5G चा रीब्रँडेड प्रकार आहे जो भारतात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झाला होता. । Samsung F15 5g

काय आहेत वैशिष्ट्ये : । Samsung F15 5g
– Samsung F15 5g 90Hz AMOLED स्क्रीनसह येतो. हा फोन Media Tech Dimension 6100+ SoC वर चालतो.

– सॅमसंग F15 5g ॲश ब्लॅक, ग्रूवी व्हायलेट आणि जॅझी ग्रीन कलर वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

– स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर 4GB रॅम सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. तसेच, 6GB रॅम सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.

– 128GB स्टोरेज वेरिएंटसह 8GB रॅमची किंमत 19,499 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन : । Samsung F15 5g

– या मोबाईलमध्ये तुम्हाला नॅनो ड्युअल-सिम स्लॉट दिला जाईल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 5G Android 14-आधारित One UI 5 दिला जात आहे.

– यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सेल) सुपर AMOLED डिस्प्ले आहे.

– तुम्हाला F15 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जात आहे. ज्यामध्ये दुय्यम सेन्सरसह 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल शूटर कॅमेरा आहे.

– समोर 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

– मोबाइलमध्ये हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, लाईट सेन्सर आणि व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर, फिंगरप्रिंट सेन्सर आहे. । Samsung F15 5g