“सनातन संस्था ही दहशतवादी”; नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याचे नमूद करत त्याची मुक्तता करण्यात आली, तसेच अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचीही पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी हा आदेश दिला आहे. या सर्व प्रकरणावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?  

दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर मी समाधानी नाही. दोन लोकांनी हे मान्य केलं आहे की, आम्ही दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांनाच शिक्षा झाली. नंतर देखील गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यामुळे तपास योग्य झाला नाही. या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्याची कुठलीही गरज नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “पोलिसांनी पुरावा सादर न केल्याने तिघांना सोडण्यात आलं. हा एक कट होता. त्यात कोण सामील होतं हे समोर आलेलं नाही. सनातन संस्थेला मी मुख्यमंत्री असताना देशव्यापी बंदी आणा अशी विनंती गृह मंत्रालयाकडे केली होती. दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी आम्ही 2 वर्ष आधी ही बंदी घालावी अशी विनंती केली होती.”  Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|

“सनातन संस्थेचा कुठे हात होता हे समोर आलं नाही. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी अद्यापही केंद्राकडे प्रलंबित आहे.  सनातन संस्था ही दहशतवादी संस्था आहे. 2011 ला आम्ही 1 हजार पानाची माहिती केंद्राकडे पाठवली होती. तसेच ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला हे मी आधीही म्हणालो होतो आणि आत्ताही म्हणतो. या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्याची कुठलीही गरज नाही,” असेही चव्हाण म्हणाले.  Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|

दरम्यान, डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: 

“काँग्रेस पक्षानंही अनेक चुका केल्या त्यात आता…” ; राहुल गांधींचं धक्कादायक विधान