तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, ‘केजरीवाल यांना..’

Sanjay Singh on BJP । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसलाय. कारण मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना आता 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर केजरीवाल यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, अश्यातच आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरीष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात तुरुंगात टाकण्याचा कट भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाने रचल्याचा आरोप संजय सिंह यांनी यावेळी केला आहे.

साक्षीदारांवर भाजपचा दबाव Sanjay Singh on BJP ।

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजयसिंह यांनी भाजपवर आरोप केला की, राघव मागुंटा, जो दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सरकारी साक्षीदार बनला आहे, त्याच्यावर केजरीवाल यांच्या विरोधात खोटे विधान करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

राघव मागुंटाचे वडील वायएसआर काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्यावर १६ सप्टेंबर २०२२ रोजी कारवाई करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या विरोधात खोटे विधान करण्यासाठी त्यांच्यावर आधी दबाव टाकण्यात आला होता पण त्यांनी नकार दिल्यावर त्यांचा मुलगा राघव रेड्डी याला अटक करण्यात आली.

केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचे मोठे षडयंत्र Sanjay Singh on BJP ।

सतत चौकशी केल्यानंतर राघव रेड्डी त्यांच्या दबावाखाली आले आणि ते एका मोठ्या कटाचा भाग बनले असा दावा त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे. दारू घोटाळ्याला भाजप जबाबदार आहे आणि पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यात सहभागी आहे, असा आरोप त्यांनी केला.

सिंह पुढे म्हणाले की, केजरीवाल हे एक प्रामाणिक नेते आहेत आणि त्यांना दिल्लीतील लोकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि शिक्षण द्यायचे आहे. केजरीवाल प्रामाणिक जीवन जगले आहेत, दिल्लीतील मुलांना चांगले शिक्षण आणि दिल्लीतील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे त्यांचे ध्येय आहे,असे ते म्हणाले.