सातारा | ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी संस्कार महत्त्वाचे

पुसेगाव, (प्रतिनिधी) – मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करावे. सुसंगतीने ज्ञान वाढते. थोरामोठ्यांच्या चरित्रातून चांगले नागरिक घडतात. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबर मनाची प्रसन्नता टिकवून ठेवावी. गुरुजनांचे विचार अंगी बाळगावेत, असे मत सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इमारत नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सचिव मोहनराव जाधव, विश्वस्त विश्वनाथराव जाधव, एस. आर. पाटील, सदस्य जयंतराव जाधव, के. डी. पवार,

उपसरपंच पृथ्वीराज जाधव, नीतिराज जाधव, येवले, मधुकर टिळेकर, सौ. दीपाली तारळकर, सौ. शकुंतला जाधव, सौ. सुरेखा जाधव, सौ. स्नेहा मदने, सौ. दीपाली जाधव, सारिका गुरव, हेमलता फडतरे, सौ. हेमलता देशमुख, माया भोसले, महेश काटवटे, प्राचार्य सुधाकर माने व पालक उपस्थित होते.

सपोनि आशिष कांबळे म्हणाले, मैदानी खेळांसाठी मुलांना प्रोत्साहीत करा. मोबाइलचा अतिवापर नको. पालकांनी पाल्यांशी मैत्रीचे नाते ठेवावे. स्पर्धांची माहिती द्यावी. पोलीस मित्र बनावे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश म्हणाले, यशस्वी होण्यासाठी ज्ञानाचा उपयोग व्हावा. मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी संस्था कार्यरत आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जात असून, विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवले जात आहेत.

शाळेस मदत करणार्‍या पालकांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. स्नेहल जाधव यांनी प्रास्ताविक केले. सौ. रूपाली फडतरे यांनी स्वागत केले. मोहनराव गुरव, सौ. काजल घाडगे, सौ. सुप्रिया जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सोनल जावळे यांनी आभार मानले.