संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे गोल रिंगण; हरिनामाने आसमंत दुमदुमला

नीलकंठ मोहिते

इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण सालाबाद प्रमाणे, यंदा बेलवाडी (ता.इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज स्थळावर तुकोबा – विठ्ठलाच्या जयघोषाने व अश्वंच्या दौडींने, ज्ञानोबा तुकाराम या जयघोशात आसमंत दुमदुमून निघाला. वैष्णवांच्या उत्साहाला आलेले उधान परिसरात चैतन्यमय असलेले वातावरण, आश्वाच्या बरोबरीने धावणारे वैष्णवजन,अश्या उत्साही भक्तीमय वातावरणात, गोल रिंगण सोहळ्यास संत तुकाराम महाराज पालखी समोरील चालणारा नगारा सर्वात प्रथम रिंगण स्थळावर सकाळी साडेसात वाजता पोहोचला.

येथील गावकऱ्यांनी व बालचिमुरड्यांनी संत तुकोबारायांची काढलेली रांगोळी,गावातील भजनी मंडळाचा हरिनाम घोष, झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी भगिनी यांनी गोल रिंगण स्थळावर एन्ट्री करून, रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पालखीतील अश्व रंगस्थळावर येताच, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम हा जयघोष उपस्थितांनी  केला. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजनाने प्रति पंढरीचे स्वरूप बेलवाडीला प्राप्त झाले होते. प्रथेप्रमाणे धनगर बांधवांनी मेंढ्यांचे रिंगण पूर्ण केले व पालखी रथाला मेंढ्यांनी प्रदक्षणा केली. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे व शरयु फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिलाताई पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले तसेच मानाच्या आस्वाची पूजन करून अश्व रिंगणात दाखल केले.

देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥

नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥

पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥

रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांनी हरिनामाच्या केलेल्या लिलया अक्षरश: देवाच्या चरणावर वाहिल्यासारख्या होत्या.हे पंढरीच्या पांडुरंगा लवकर तुझे दर्शन घडू दे,या श्रद्धेने निघालेला क्षेत्र देहू येथून संत तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांचा दळभार रिंगण सोहळ्यात देहभान विसरून माझा हा वारीचा नियम,अखंड राहू दे अशीच विनवणी पंढरीच्या पांडुरंगाला हरिनामातून करताना दिसत होते. २४ तास जनतेला संरक्षण पुरवणारी पोलीस यंत्रणा, हरिनामात दंग होऊन रिंगण सोहळ्यात देहभान विसरून प्रदक्षिणा पूर्ण केली.एरवी गुन्हेगारांच्या मागे धावावे लागते मात्र हरिनामाच्या रसात वेगळा आनंद मिळाला अशी भावना अनेक पोलीस बांधवांनी यावेळी व्यक्त केली.

रिंगण सोहळ्यात वारकरी टाळकरी पखवाजे तुळशी वाल्या भगिनी झेंडेकरी यांचे रिंगण झाल्यानंतर मानाचे अश्व धावण्यासाठी रिंगणात सोडण्यात आले.वेगाने अश्वांनी आपली प्रदक्षिण पूर्ण केली.आश्वाचे दर्शन व त्यांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी लाखो हात जमिनीवर टेकले.उत्साहपूर्ण रिंगण सोहळा आटोपल्यानंतर, बेलवाडी गावामध्ये पालखी पहिल्या विसाव्यासाठी दाखल झाले गावकऱ्यांनी प्रत्येक प्रमाणे वारकऱ्यांना भोजन देत,वारकऱ्यांचे आधारतिथ्य केले.

बेलवाडी गावकरी गोल रिंगण सोहळा म्हणजेच आपला मोठा सण मानत असून,अनेक पै पाहुणे परगावी दिलेल्या मुली नातवांडे तुकोबारायांच्या दर्शनासाठी अलोट गर्दीत दिसत होते.फुघड्या रंगल्या,लगोरी वारकऱ्यांनी रचल्या,झिम्माचे वारकऱ्यांनी फेर धरले,ते नयन रम्य दृश्य उपस्थितांनी डोळ्यात टिपले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह भ प भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे,संजय महाराज मोरे,बेलवाडी गावच्या सरपंच मयुरी जामदार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर उपस्थित होते.

तर ग्रामपंचायत बेलवाडी तसेच विकास सोसायटी व सार्वजनिक मंडळ यांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा केली.येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन करून,वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता.दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा पुढील अंथुर्णे मुक्कामासाठी रवाना झाला.