‘इंद्रायणी’ मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री

Santosh Juvekar Entry In ‘Indrayani’ |  अभिनेता संतोष जुवेकर ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष जुवेकरने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या विविध भूमिकांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच संतोष जुवेकर एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून यात संतोष जुवेकर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘इंद्रायणी’ मालिकेमध्ये संतोष जुवेकर पाठिराखा ही भूमिका साकारणार आहे. या प्रोमोमध्ये साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जात असल्याचं दिसत आहे. पण, पैसे अपुरे असताना आणि कोणतीही माहिती नसताना तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा तिची साथ देणार आहे.

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये संजीवनीला आणण्यासाठी इंदूला आळंदीत जायचं असतं. पण तिची ती शेवटची बस चुकते म्हणून ती नाराज होते. “शेवटची बस गेली. आता आळंदीला कसं जाणार? संजीवनीला कसं आणणार?” असा प्रश्न ती विचारते. तेवढ्यात एक मागून आवाज येतो. इंदूच्या मदतीला तिचा पाठिराखा येतो. “अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बस. रामकृष्ण हरी” असं म्हणत त्याची मालिकेत एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. यात तो वारकरीच्या वेशात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरते. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. यातच आता यात संतोषची एन्ट्री झाल्याने चाहते देखील त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा: 

‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप