पुणे जिल्हा | शिक्रापूरच्या उपसरपंचपदी सारिका सासवडे बिनविरोध

शिक्रापूर (वार्ताहर) – येथील उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सारिका उत्तम सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सीमा गणेश लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झालेले असल्याने नुकतीच सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.

यावेळी माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य विशाल खरपुडे, मयूर करंजे, रमेश थोरात, सुभाष खैरे, मोहिनी संतोष मांढरे, ग्रामपंचायत सदस्य वंदना भुजबळ, सारिका सासवडे, कृष्णा सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, प्रकाश वाबळे, उषा राऊत हे उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच पदासाठी प्रकाश वाबळे, शालन राऊत व सारिका सासवडे यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान प्रकाश वाबळे व शालन राऊत यांनी दोघांनी अर्ज मागे घेतल्याने सारिका सासवडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सारिका सासवडे यांचा यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्या रोहिणी सासवडे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सुजाता खैरे, माजी ग्रामपंचायत सदस्या शिला करंजे,

रमेश भुजबळ, पंढरीनाथ गायकवाड, श्री गणेश नागरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन विलास भालके, संचालक शेखर करंजे, रेणुका थिटे, उद्योजक दादासाहेब बांदल, उत्तम सासवडे, काकासाहेब चव्हाण, जितेंद्र जोशी, विश्वास सासवडे, सोमनाथ भुजबळ, अतुल थोरवे, अंकुश घारे, प्रकाश सोंडे, युवराज चौरसिया, संदीप टेमगिरे, मंगेश सासवडे, बाळासाहेब राऊत यांसह आदी उपस्थित होते.