satara | आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने सरपंच सौ. सारिका शेंडे सन्मानित

दहिवडी, (प्रतिनिधी) – माण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका शेंडे यांना गोवा येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

बेळगावी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंदिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी यांच्यातर्फे सरपंच सारिका शेंडे यांची निवड करत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोव्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी माजी केंद्रीय कायदामंत्री वीरप्पा मोइली, फाउंडेशनच्या चेअरमन व उद्योगपती डॉक्टर सीमा इंग्रोळे, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जयराज लोंढे, अरविंद घट्टी, राजू शिंगाडे,

एलिझाबेथ इस्लास लिऑन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघन्नावर यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर, फाउंडेशनचे विविध पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच सारिका शेंडे यांचे आमदार जयकुमार गोरे, लोकनेते राजारामबापू बोराटे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, शिवराज शेंडे, उपसरपंच राजेंद्र पिसे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.