सातारा : आई वडिलांना आनंद देणारे पाल्य हेच समाजाचे भूषण – संजीव साळुंखे

कलेढोण- आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारे पाल्य हेच समाजाचे भूषण आहे, असे उदगार चेअरमन संजीव साळुंखे यांनी कलेढोण येथील हणमंतराव साळुंखे विद्यालयात गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात काढले.

सातारा जिल्ह्यातील पहिला महिला पू (कमर्शियल पायलट) पूर्वा गुदगे, महिला डॉक्टर गौरी लोखंडे, बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण (युनिवहर्सिटी ऑफ सेंट्रल मिसूरी) अमेरिका सोहम पाटील, मास्टर इन सायबर सेक्युरिटी नॉर्थ्येस्टन युनिव्हर्सिटी (अमेरिका) श्रेया पाटील श्री. वैभव गवरे दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणी १ व राज्य कर निरीक्षक (STI) दोन्ही पदी निवड झालेबद्दल या सर्व गुणवंतांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला.

या प्रसंगी मजनुभाई मुलाणी, महेश पाटील राजेंद्र कणसे, संजय गुदगे, गवरे परिवार, सुरेश पाटील व परिवार राजेंद्र लोखंडे व परिवार, अभिजित दबडे, मालोजी कुंभार, सौ. सुनीता महाजन, आदी मान्यवर व विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- गुणवंतांचा सत्कार करताना संजीव साळुंखे व मान्यवर.