सातारा – भाजप किसान मोर्चा सातारा तालुकाध्यक्षपदी उत्तम शिंदे

शिवथर  – सातारा तालुका पूर्व मंडलच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सातारा तालुका पूर्व मंडलच्या अध्यक्षपदी पाटखळ ता. सातारा येथील उत्तम शिंदे (पाटील) यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी नियुक्तीचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आ. महेश शिंदे, सातारा तालुकाध्यक्ष पूर्व मंडल निलेश नलावडे , गणेश पालखे जिल्हा चिटणीस, रवी साळुंखे, संतोष कणसे जिल्हा सरचिटणीस, सुनील जाधव, प्रविण धस्के, विलास (बापू) शिंदे, युवा नेते अरुण कदम यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी उत्तम शंकर शिंदे, विकास शिंदे, बजरंग शिंदे, सुरेश शिंदे, मयूर शिंदे, संजय शिंदे, आण्णा शिंदे, रणजित माने, सोनू साबळे, अमोल शिंगटे, साईराज कदम, रजत करळे, निलेश शिंदे, राहुल पवार, गिरीश आवळे, प्रवीण शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.