सातारा : आमदार शिंदे यांनी अधिवेशनात दूध आंदोलनाबाबत उठवला आवाज

पुसेगाव – सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर मिळावेत या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करून, निषेध व्यक्त केला होता.

काल त्यास अनुसरून कोरेगाव विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला व शेतकऱ्यांच्या प्रताप जाधव म्हणाले, या अधिवेशनात सरकारने दुधासंदर्भात विषय घेतला नाही तर शिवसेना यापेक्षाही आंदोलन उभारेल असा इशारा दिला होता.

या जिल्ह्यातील निष्क्रिय प्रतिनिधी दुधाचा प्रश्न असो किंवा दुष्काळाचा असो अजिबात अधिवेशनामध्ये आवाज उचलत नाहीत आणि म्हणूनच निष्क्रिय म्हणण्याची वेळ येत आहे. यास अनुसरून कोरेगाव विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दूध आंदोलनाबाबत व विविध प्रश्नाबाबत आवाज उठवला आहे.

शेतकऱ्यांना आपण अर्थसहाय्य सगळीकडे करतो नुकसान भरपाईच्या बाबतीत मदत करतो. परंतु आज शेतकऱ्यांचा जोडधंदा अडचणीत आहे. पशुखाद्य चारा वगैरे इतका महाग झाला आहे. शासन दुधाला 35 रुपये दर देत आहे पण त्याच्यामध्ये खर्चही निघत नाही व ही वस्तुस्थिती आहे.

सरकारने पाच रुपये अनुदान दिलेला आहे ते अजून वाढवावं दुधाचे दर बाहेर 100 ते 50 रुपये प्रति लिटर अशा प्रकारचे असून,शेतकऱ्यांना मात्र 35 रुपये दर दिला जातो, दरामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे अधिवेशनामध्ये आमदार शशिकांत शिंदे निदर्शनास आणून दिले याबाबत प्रताप जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.