satara news : कामथडी हद्दीत दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

कापूरहोळ – पुणे – सातारा महामार्गावरून कामथडी तालुका भोर येथे पायी जाणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीची धडक बसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी आयुश गणेश शेलार (वय 22 रा. सुंदरवाडी, ता. महाड )या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जयसिंग शंकर वैराट (वय 64, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे अपघातात मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

या बाबत राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 12) दुपारी चारच्या सुमारास कामथडी गावचे हद्दीत पुणे – सातारा महामार्गावर पुणे बाजू कडून सातारा बाजूकडे जाताना बुलेट गाडीचालक (एमएच 04 जेआर 0909) आयुश शेलार यानी जयसिंग वैराट यांना जोरात ठोस दिल्याने अपघात झाला.

बुलेटचालकाने अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण करून जखमीला सिध्दिविनायक हॉस्पिटल येथे उपचारकामी नेले. मात्र उपचारा दरम्यान शेलार मृत्यू झाला. आयुश गणेश शेलार (वय 22 रा. सुंदरवाडी, ता. महाड ) याच्यावर रविवारी (दि. 14) रोजी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छाया शिवाजी पाटोळे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस नाइक सागर कोंढळकर करीत आहेत.