सातारा – अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली मतदार दिनानिमित्त शपथ

सातारा – चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी व सहयोग, समाज माध्यमांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे.

शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील मतदारांचा सहभाग घेऊन लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माइनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.