समाधानकारक! पुण्यात दिवसभरात फक्‍त 180 नवे बाधित

करोनाच्या दहशतीत वावरणाऱ्या पुणेकरांना दिलासा
पुणे –
करोनाच्या नव्या बाधितांची संख्या सोमवारी फक्‍त 180 नोंदवली गेली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरावर असलेले करोनाचे सावट दूर होण्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 751 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला.

4 लाख 69 हजार 927 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 4 लाख 55 हजार 651 जण बरेही झाले आहेत. बाधितांचा दर 4.5 टक्‍क्‍यांवर आला आहे.

“रविवारी टेस्ट कमी होतात. त्यामुळे कदाचित बाधितांची संख्या कमी दिसत असेल, असा एक तर्क आहे; परंतु वाढली तरी ती सात टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढणार नाही,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.