ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी शनिवारी निवड चाचणी

पुणे – 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहराची निवड चाचणी येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ पुणे येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

निवड चाचणीच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत वजने घेण्यात येतील. परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन स्पर्धेची वेळ ठरवली जाईल.

स्पर्धेसाठी स्पर्धकांना वजन गटात 2 किलोपर्यंत सूट राहील. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात येणार नाही. या चाचणीबाबत संघातर्फे लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.