सौदी अरेबियाने भारताची विमान सेवा थांबवली

नवी दिल्ली – भारतातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सौदी अरेबियाने भारताबरोबरची विमान सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सौदीतून एकही विमान भारतात जाणार नाही किंवा भारतातून सौदीत एकही विमान येऊ दिले जाणार नाही, असा आदेश तेथील प्रशासनाने जाहीर केला आहे.

भारत, ब्राझील आणि अर्जेन्टिना या तीन देशांच्या विमान सेवेवर तेथील नागरी विमान वाहतूक खात्याने ही बंदी जाहीर केली आहे. सर्वच स्वरूपांच्या विमान सेवांना ही मनाई लागू असणार आहे.

एअर इंडिया एक्‍स्प्रेस या भारतीय विमान कंपनीच्या विमानाला दुबईच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने 24 तास अडवून ठेवण्याचा प्रकार अलीकडेच घडला होता.

या कंपनीच्या विमानातून 28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी दोन करोनाग्रस्त प्रवासी दुबईत आणल्याच्या आरोपावरून एअर इंडिया एक्‍स्प्रेसच्या विमानावर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर आता सौदी अरेबियाने भारताची विमान वाहतूकच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment