पिंपरी | स्काऊट मास्टर, गाइड कॅप्टन शिबिराची सांगता

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाइडस् राज्य संस्था, पुणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाइड, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षकांकरिता आयोजित स्काऊट मास्तर व गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच भोसरी येथे झाली.

सात दिवसांच्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 39 गाइड कॅप्टन व 55 स्काऊट मास्टर यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी या प्रशिक्षणार्थीनां स्काऊट चळवळीचा इतिहास, नियम, वचन, ध्येय, नियम, दोरीच्या गाठी, प्रथमोपचार, रोग्याला वाहून नेण्याच्या पद्धती, बंधने, नकाशा वाचन याच्यासह स्काऊट शिक्षणातील प्रथम, द्वितीय व तृतीय सोपान अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपा प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या वेळेस शिल्पी शुक्ला, करुणा विश्वकर्मा, फरजना शेख, अरुण पेशकार, शिबिर संचालक अंजोलीना भाकरे, सहायक दिगंबर करंडे, रफेल जॉन स्वामी, दिलीप नेवसे, चंद्रभान पोखरकर, आनंद सोमवंशी, अपेक्षिता घारगे, शमा शिकलगार, विधा पेन्सलवार इत्यादी यशस्वी केले.

प्रशिक्षण शिबिरात गेस्ट लेक्चर म्हणून प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रायगड, सी-स्काऊट प्रमुख डॉ. गोपी शेट्टी, मनोज पवार, बिपीन देशमुख, अब्दुल नबी यांनी उपस्थित राहून शिबिरात मार्गदर्शन केले.