वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड

मुंबई : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.

२१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध निवडणून आले. यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर पंकजा मुंडे विराजमान झाल्या आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीत पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे एकत्र आले. आम्ही एकत्रित पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलोय, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले होते.  त्यानुसार आज पंकजा मुंडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.