पुणे | रायसोनीची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सुरू केलेल्या मार्गदर्शन योजना २०२३-२४ मध्ये जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंट पुणे यांची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.

एआयसीटीईने यासाठी १५ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. या योजनेंतर्गत रायसोनी काॅलेज पाच लाभार्थी संस्थांना मार्गदर्शन करणार असून, यात पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मार्गदर्शन योजनेंतर्गत मार्गदर्शक संस्था म्हणून निवड झाल्याचा सन्मान मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. ही संधी संस्थेच्या तांत्रिक शिक्षणात उत्कृष्टता वाढवण्याच्या आणि सहकारी संस्थांच्या वाढीस आणि विकासाला चालना देणार आहे,

असे जीएचआरसीईएमचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी सांगितले आहे. रायसोनी एज्युकेशन अध्यक्ष सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी या यशाबद्दल रायसोनी कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले आहे.