निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

पुणे – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून विविध वयोगटात 229 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर येथे आज (शनिवार) व उद्या (रविवार) या कालावधीत होणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 71 हजार रुपयांची पारितोषिक रक्कम म्हणून देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन ट्रुस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक आश्‍विन त्रिमल, ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, मिलेनियम स्कूलचे मुख्याध्यापक अनवित पाठक, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे यांच्या हस्ते होणार आहे.