फायदाच फायदा ! ‘या’ योजनेत Senior Citizen ला मिळणार 8.2% व्याज ! Tax मध्ये देखील मिळणार सूट

सीनियर सिटीजनला गुंतवणूक करण्यासाठी अनेक ऑप्शन (Senior Citizen Scheme) आहेत. परंतु पोस्ट ऑफिस हा (Senior Citizen Savings Scheme (SCSS) गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. पहिले म्हणजे यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी असते आणि दुसरे म्हणजे या योजनेतील परतावाही सध्या उत्कृष्ट आहे. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो. त्यात गुंतवणूक सुरू करणे खूप सोपे आहे. तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

खाते उघडण्याचे नियम
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, साधारणपणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक खाते उघडू शकतात. याशिवाय 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी खाते उघडू शकतात. यामध्ये पती किंवा पत्नीसह सिंगल किंवा संयुक्तपणे खाते उघडता येते. संयुक्त खात्यात, पहिल्या खातेदाराचे संपूर्ण रकमेवर नियंत्रण असते. एका आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील एकूण व्याज रु.50 हजार पेक्षा जास्त असल्यास व्याज करपात्र आहे आणि भरलेल्या एकूण व्याजातून विहित दराने TDS कापला जाईल. जर फॉर्म 15G/15H सबमिट केला असेल आणि मिळालेले व्याज विहित मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर कोणताही TDS कापला जाणार नाही.

गुंतवणुकीचा फंडा
अधिकृत वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये 1000 रुपयांच्या पटीत जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. तुम्ही विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा केल्यास, ती रक्कम तुम्हाला लगेच परत केली जाईल. यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसचे ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते 1000 रुपयांमध्ये उघडू शकता. गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक 8.20 टक्के व्याज दिले जात आहे. व्याज तिमाही आधारावर देय आहे. जर क्लेम न केल्यास, या व्याजाच्या रकमेवर कोणताही अतिरिक्त लाभ किंवा व्याज दिले जात नाही.

खाते कधी मॅच्युर होईल
या योजनेअंतर्गत (Senior Citizen Savings Scheme (SCSS) खाते 5 वर्षात मॅच्युअर होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खाते बंद करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही खाते वाढवू शकता. खात्याची मॅच्युरिटी असेल आणि जर धारकाचा मृत्यू झाल्यास, पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर त्या वेळी खात्यात असलेल्या रकमेवर लागू होईल. खाते मुदतीपूर्वी बंद झाल्यास, पोस्ट ऑफिसने विहित केलेल्या अटींमधून जावे लागेल.