पुणे | ज्येष्ठ नागरिक करणार धंगेकरांचा प्रचार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काॅंग्रेस इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात आता शहरातील दोन हजार ज्येष्ठ नागरीक उतरणार आहेत.

धंगेकर यांच्या प्रचारार्थ शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक घेण्यात आली. या वेळी संघटनेचे दोन हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांच्या पुढाकाराने ही प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे.

संघटनेचे कायदा सल्लागार बाळासाहेब बाणखेळे यांनी प्रचाराची रुपरेखा आखली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले.

घरेलू कामागारांचा मेळावा
शहर काॅंग्रेसच्या वतीने घरेलू कामगार, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रतिभाताई रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक चंदुशेठ कदम, माजी नगरसेवक संजय बालगुडे, स्नेहल पाडळे, घरेलु कामगार संघटनेच्या अध्यक्ष किरणताई मोघे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महागाई, बेरोजगारी, समाजातील वाढलेला असंतोष या विरोधात मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी, शिवसेना महिला शहर प्रमुख सविता मते, युक्रांदचे संदीप बर्वे, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे, कोथरूड काँग्रेस महिला अध्यक्ष मनीषाताई करपे, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ज्योतीताई सूर्यवंशी, मनीषा गायकवाड, छायाताई भोसले आरती गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.