पिंपरी | निरोगी आयुष्यासाठी ज्येष्ठांनी नियमित व्यायाम करावा – वसंत ठोंबर

चिखली, (वार्ताहर) – जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन, जमेल तसा व्यायाम, मित्र मैत्रिणींबरोबर संवाद करणे, फिरणे, योगा बरोबर हास्य योग व सकारात्मक दृष्टिकोन ही ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी व निरोगी जीवन जगण्याची महत्त्वाची सूत्रे आहेत, असे मत वसंत ठोंबर यांनी व्यक्त केले.

ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला. या वेळी ते बोलत होते. एखाद्याच्या आयुष्यादरम्यान व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे. हे अगदी स्पष्ट आहे की जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीराची शारीरिक क्षमता कमी होत जाते.

त्यामुळे हे लक्षात ठेवले पाहिजे की, नियमित व्यायामामध्ये व्यस्त राहणे हा ज्येष्ठांसाठी स्वस्थ जीवनशैली टिकवून ठेवण्याचा एक अद्भूत मार्ग असून, ज्येष्ठांमध्ये व्यायामाचे फायदे जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या शरीरातील जैविक प्रक्रियाच नव्हे तर आपल्या शरीराच्या गरजाही मोठ्या प्रमाणात बदलतात.

या वेळी वंदना सोहोनी, उषा तळपटे, उषा गायकवाड, रमाकांत ताटकर, मधुकर धकाते, दीपक साळुंखे, किसन गायकवाड, आशा राऊत, आठ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस सोहळा विरुंगळा केंद्र, ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा फुलेनगर चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व सचिन सानप तसेच ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.