खासगी क्षेत्रात सात लाख नोकरभरती

नवी दिल्ली : 2020 मध्ये, खाजगी क्षेत्रात अंदाजे सात लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात हि बाब समोर आली आहे.

मायहियरिंगक्लब.कॉम आणि सरकार-नौकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यात जास्तीत जास्त नोकऱ्या स्टार्टअमध्ये निर्माण होतील. हे सर्वेक्षण देशाती मोठ्या 42 शहरांतील 12 उद्योग क्षेत्रातील 4,278 कंपन्यांचा समावेश आहे.

मुंबई, दिल्ली, बंगळुरू येथे सर्वाधिक संधी

२०२० मध्ये बेंगळुरू, मुंबई, दिल्ली एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या शहरात सर्वाधिक नोकरीच्या संधी असतील . या शहरात सुमारते पाच लाख चौदा हजार 900  नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. राजेश कुमार म्हणाले, 2020 मध्ये तंत्रज्ञानाची किंवा तांत्रिक कौशल्यांची मागणी इतर कौशल्यांपेक्षा जास्त असेल.

2019 मध्ये 5.9 लाख रोजगार

एका सर्वेक्षणानुसार, 2019 मध्ये 6.2 लाख नोकर्यांच्या तुलनेत सुमारे 9.9 लाख रोजगार निर्माण झाले होते. 2020 साली किरकोळ आणि ई-कॉमर्स क्षेत्रात  एक लाख 12 हजार रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत पगार वाढेल

या सर्वेक्षणानुसार, देशात पगार व बोनसमधील युनिट पॉईंट्समध्ये वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, जो एकूण 8 टक्के असू शकते. राजेश कुमार म्हणाले, पगारवाढ अंदाजे  8  टक्के आणि बोनस 10 टक्के राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पगारवाढ एक टक्क्याने वाढेल.

 

Leave a Comment