#AUSvPAK 3rd Test : सिडनी कसोटीसाठी पाकनं घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता…

Australia vs Pakistan 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला प्लेइंग-11 जाहीर केलं आहे. या सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला पाकिस्तान संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी साजिद खानला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली आहे. इमाम-उल-हक यालाही स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी सॅम अयुब पदार्पण करणार आहे.

शाहीन आफ्रिदीला या सामन्यातून वगळण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचे बाहेर पडणे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. या मालिकेत शाहीनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजीची कमान त्याच्या हातात होती. दुसरीकडे, इमाम-उल-हक या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला आहे. तो पाकिस्तानला चांगली सुरुवात देऊ शकला नाही, त्यामुळेच त्याला संघातून वगळावे लागले.

शाहीनच्या जागी संघात आलेला साजिद खान हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत. शेवटच्या वेळी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता. 2022 मध्ये तो पेशावरमध्ये हा सामना खेळला होता. त्यानंतर तो पाकिस्तान संघात स्थान मिळवू शकला नाही. इमामच्या जागी संघात आलेला युवा क्रिकेटर सॅम अयुबसाठी सिडनी कसोटी ही मोठी संधी आहे. सिडनी कसोटीसाठी पाकिस्तानच्या प्लेइंग-11 मध्ये हे दोनच बदल आहेत.

Zimbabwe Tour of Sri Lanka 2024 : श्रीलंका दौऱ्यासाठी झिम्बाब्वेचा ODI आणि T20 संघ जाहीर…

पाकिस्तानचे प्लेइंग-11

सैम अयूब (पदार्पण), अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, आमेर जमाल.

Sports in 2024 : यंदा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंसाठी व्यस्त वेळापत्रक तर चाहत्यांसाठी क्रीडा मनोरंजनाची भरपेठ मेजवानी…

पाकिस्तान संघाने गमावली आहे कसोटी मालिका…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता पण दुसऱ्या डावात त्याने चांगली लढत दिली. 0-2 अशा पिछाडीनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नवत राहिले आहे. पाकिस्तानचा संघ गेल्या 28 वर्षांत एकदाही ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. सिडनी कसोटीत तो हा नको असलेला विक्रम तोडण्याचा प्रयत्न करेल.