शरद भोजन योजनेच्या वाघोलीतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप

वाघोली(प्रतिनिधी) : कोरोना परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शरद भोजन योजनेच्या वाघोलीतील ९७२ लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे तर २८३३ लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळामध्ये रेशनकार्ड नसलेल्या व गरजू नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र नागरिकांचे फॉर्म जमा करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ९७० लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे तरी दुसऱ्या टप्प्यातील २८३३ लाभार्थ्यांना धान्याचे वाटप सातव हायस्कूल येथे करण्यात येत आहे. शरद भोजन योजने व्यतिरिक्त वाघोलीतील ६३८० रेशनिंग कार्ड धारकांना शासकीय रेशनिंग धान्याचे वाटप करण्यात आले असल्याचे उबाळे यांनी सांगितले.

Leave a Comment