सातारच्या जागेसाठी तीन चार नावे चर्चेत ; नेमकं कोणाला मिळणार तिकीट? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

Sharad Pawar on satara । सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दोन ते तीन दिवसात सातारचा उमेदवार जाहीर करू असे म्हटले आहे.

सातारच्या लोकसभेसाठी तीन तीन चार नावे चर्चेत Sharad Pawar on satara ।

खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार? याबाबत बोलताना शरद पवार यांनी चार नावे घेत सस्पेन्स कायम ठेवला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सातारच्या लोकसभेसाठी तीन तीन चार नावे चर्चेत असल्यास सांगितले. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे ते म्हणाले. आम्ही यावरती चर्चा करून उमेदवार घोषित करू अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.

सातारामधून मला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह Sharad Pawar on satara ।

दरम्यान, शरद पवार यांनी सातारामधून मला स्वतःला सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होत असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे सातारच्या उमेदवारीचा निर्णय आज होईल असं बोलला जात होतं. मात्र, आता पुन्हा एकदा हात दोन-तीन दिवसांनी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, माढा लोकसभेच्या अनुषंगाने विचारण्यात आला असता शरद पवार यांनी ती जागा धनगर समाजासाठी द्यावी यासाठी मी स्वतःहून याबाबत घोषणा केली होती असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, साताऱ्याचा जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा
सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; श्रीनिवास पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार