ganeshutsav 2023 : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला देशी, विदेशी फळांची आरास; फळांनी सजला श्रींचा गाभारा

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील (market yard) श्री शारदा गजाननाला (Sharada Gajanana) सोमवारी (दि. 24) विवीध प्रकारच्या 16 हून अधिक देशी विदेशी फळांची (fruits) आरास करण्यात आली.

भव्य शारदा गजानन महालात विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीभोवती करण्यात आलेल्या आरासमुळे उत्सव मंडपाचा गाभारा व सभामंडप लाल, पिवळ्या, हिरव्या, नारंगी, लाल, जांभळसर रंगांनी श्रींचा गाभारा सजला होता.

भाद्रपदातील एकादशीच्या सुमूहूर्तावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागात दाखल होणार्‍या कलिंगड,पेर, ब्लू बेरी, सिताफळ, खरबूज, चिक्कू, मोसंबी, संत्री, सफरचंद, मका कणीस, डाळींब, अननस, पेरू आदींमार्फत ही आरास करण्यात आली.

आवश्यकतेनुसार सजावटीसाठी फळांचा वापर करण्यात आला होता. मार्केट यार्डातील फळांचे अडतदार सत्यजित झेंडे यांच्या वतीने ही आरास करण्यात आली. यावेळी, संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते