Share Market : गुंतवणूकदार चिंतेत; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 434.30 अंकांनी किंवा 0.59% घसरून 72,623.09 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 141.90 अंकांनी किंवा 0.64% टक्क्यांनी घसरून 22,055.05 वर बंद झाला.

तर आज शेअर बाजारात सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टी किंचित वाढीवर उघडले पण लगेच लाल रंगात घसरले. NSE निफ्टीने 26.50  अंक किंचित उसळी घेत 22,081 अंकांवर व्यवसाय सुरु केला. बीएसई सेन्सेक्स किंचित वाढीसह 72, 677 अंकांवर उघडला. यामुळे आज देखील शेअर बाजारात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.

सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांपैकी 20 कंपन्या तोट्यात राहिल्या. तर निफ्टीचे 37 शेअर्स तोट्यात राहिले. सेन्सेक्स समभागांमध्ये, एनटीपीसी 2.71 टक्क्यांनी घसरला. याशिवाय पॉवर ग्रिड, विप्रो, एचसीएल टेक, एल अँड टी आणि टेक महिंद्रामध्ये मोठी घसरण झाली. तर दुसरीकडे, नफ्यात असलेल्या समभागांमध्ये टाटा स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे.  तसेच पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो यांसारख्या निर्देशांकात तेजी होती तर निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस घसरणीसह व्यवहार करत होते. आज अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी चार कंपन्यांचे शेअर्स घसरले होते तर अदानी पॉवरचा शेअर किंचित वाढीसह व्यवहार करत होता.